Srinu Khade


ग्रंथराज ग्रामगीता *अध्याय 27 वा.... सामुदायिक प्रार्थना*  वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित आजच्या युगाची संजीवनी बुटी *ग्रामगीता*
विषय...................................

 *हाचि प्रश्न संतापुढती | पूर्वीहि होता जवळ पंथ लढती |  म्हणोनिच विठ्ठल ब्रह्ममूर्ति |  ठेविली त्यांनी सर्वापुढे ||२२||*

 *सर्व पंथांच्या संतसज्जनी |  केली एकी तये स्थानी | ज्ञान प्रेमज्योति पेटविली भुवनी | महाराष्ट्राच्या ||२३||*

 *प्रिय मित्रांनो !* महाराज समजावून सांगतात की बाबा ! मानसे जेवढे आहेत तितकेच त्यांचे मनही आहे, व जितके मन त्यापेक्षाही मनातील विचार असंख्य आहे. त्यामुळे सर्वांनाच पटतील असे नाही. प्रत्येकाने आपापला वेगळेपणा विसरून सामुदायिक ठिकाणी एकत्र येऊन उपासना करावी. परंतु हे बहुतेक लोकांना पटत नाही. जो तो आपापल्याच उपासनेची थोरवी गातो त्यामुळे जिकडे तिकडे देवडे आहेत, व त्याचे देवही आहेत. जितकी देवडे आहेत तितके देवही आहेत, कोणत्याही एका देवाला निवडल्यास सर्वांचे एक मत होणे अशक्य आहे. म्हणून हा भेद आताच नाही तर पूर्वीही होता. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात की,
     पुर्विही आपसात पंथपंथाची भांडणे  होत, तेव्हा संतांपुढे हाच प्रश्न होता. म्हणून त्यांनी मूळ तत्व जे निर्गुण ब्रह्म सगुणमूर्ती विठ्ठल रूपाने सर्वापुढे ठेवली. सर्व पंथातील संत व सज्जन त्यावेळी एक झाले व त्याने महाराष्ट्रात ज्ञान व भक्ती याच्या एकीकरणाची ज्योत प्रज्वलित केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
 अशाप्रकारे सर्व पंथातील लोक एक आराध्य दैवत सगुण रूप मूर्ती विठ्ठल यांना मानतात. प्रत्येकांच्या मुखातून माऊली माऊली हा शब्द निघतो. प्रत्येकांचे मन व भावना एकाच ठिकाणी वेदली गेली ती म्हणजे विठ्ठल मूर्ती. याप्रमाणे अनेक संतांचे व अनेक पंथांचे एकीकरण त्याकाळी संतांनी एक आराध्य दैवत मूर्ती ठेवून घडवून आणले, त्याच प्रकारे आज शुद्ध आसन खादीचे वरी गोल टकिया मांडून त्यावर आपापल्या मनातील गुरुदेव विराजमान करून सामुदायिक प्रार्थना करायचे आहे. याने आपली सर्वांची इच्छाशक्ती व ऊर्जा एके ठिकाणी विराजमान होईल त्यामुळे विश्वात शांतता नांदेल.असे वंदनीय विश्वगुरू राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात.
जय गुरु 🙏🙏          

                   - संकलन -
        *श्री.श्रीनिवास नथ्थुजी खाडे*
      मु.कोब्बई (ह.मु.बेला), मंडळ.बेला.               
            जि.आदिलाबाद,तेलंगणा,
     (ग्रामगीता प्रबोधन व ग्रामगीताचार्य)
                 मो. 9666899107

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!